बदलापूर एमआयडीसीत डाईंग कंपनीला भीषण आग; तासाभराच्या झुंजीनंतर नियंत्रण!

बदलापूर एमआयडीसीत डाईंग कंपनीला भीषण आग; तासाभराच्या झुंजीनंतर नियंत्रण!
Published on

डाईंग कंपनीला भीषण आग
बदलापूर एमआयडीसीतील घटना
बदलापूर, ता. १७ (बातमीदार) ः शहराच्या पूर्वेतील मानकिवली एमआयडीसी परिसर पुन्हा एकदा आगीच्या घटनेने हादरला. प्लॉट क्रमांक एफ-११ येथील ‘इको नीट प्रोसेसर’ या कापड (डाईंग) प्रक्रियेच्या कंपनीत शुक्रवारी (ता. १७) दुपारी भीषण आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी तत्काळ बाहेर पडत स्वतःचा बचाव केला.
आग लागलेल्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कापडसाठा असल्याने ज्वाळांनी क्षणार्धात विक्राळ रूप धारण केले. त्या परिसरात केमिकल ड्रम असल्याने आगीचा भडका आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली होती. काही मिनिटांतच अधिकारी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शैलेश जगताप यांच्यासह १८ जवानांची टीम आणि पाच अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास एक तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मोठ्या प्रमाणात नुकसान
या आगीचे नेमके कारण काय याचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार महावितरणकडून सकाळपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर अचानक स्पार्क होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com