हा सगळा प्रकार केवळ राजकीय स्टंट - युनूस शेख

हा सगळा प्रकार केवळ राजकीय स्टंट - युनूस शेख
Published on

हा प्रकार राजकीय स्टंट ः युनूस शेख
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १७ : मुलगी मोठी होत असल्यामुळे काहींना खुपत आहे. हा सगळा प्रकार केवळ राजकीय स्टंट असल्याची टीका एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी केली. शेख हे शुक्रवारी मुंब्रा पोलिस स्थानकात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
मुंब्र्यातील नगरसेविका सहर शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. या प्रकरणावरून मुंब्र्यात राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सहर शेख व युनूस शेख यांची बाजू मांडण्यासाठी एमआयएमचे गटनेते सैफ पठाण यांनी विरोधक आणि तक्रारदारांकडून याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला आहे. तर युनूस शेख हे शुक्रवारी मुंब्रा पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहिले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर शेख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी आम्ही पुढील दोन दिवसांत आमची भूमिका स्पष्ट करू आणि ठोस उत्तर देऊ. आमच्यावर करण्यात येणारे सर्व आरोप चुकीचे आहेत. या सर्व प्रकरणी करारा जवाब मिलेगा, असा इशारा शेख यांनी दिला. तसेच यामागे कोण कोण आहे, ते समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com