मुंब्र्यात ‘निदा खान’चे वास्तव्य

मुंब्र्यात ‘निदा खान’चे वास्तव्य
Published on

मुंब्र्यात ‘निदा खान’चे वास्तव्य?
नाशिक पोलिस मुंब्र्यात दाखल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : नाशिक टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या निदा खान ही दोन महिन्यांपासून मुंब्रा परिसरात पतीसह राहत असल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांचे एसआयटी पथक मुंब्रा येथे दाखल झाले. तसेच तिच्या पतीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली; मात्र प्राथमिक चौकशीत कोणतीही ठोस माहिती समोर आली नसल्याचे समजते. पथकाने तासभर परिसरात चौकशी व पाहणीही केली.
तपासात निदा खान ही संबंधित कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर कार्यरत होती. पदाचा गैरवापर करून काही प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ती मूळ भिवंडी परिसरातील असून निदा खान हिनेदेखील ट्रान्स्फर घेऊन पतीसोबत मुंबईत वास्तव्यास येत मालाड व हिरानंदानी परिसरातील कंपनी कार्यालयात काम सुरू केले; मात्र ९ एप्रिलला कंपनीकडून तिला कामावरून कमी केल्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी तिच्या मावशीने तिला नाशिक येथे नेल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे.
तर तिचा शोध घेण्यासाठी एसआयटी पथक मुंब्रा येथे दाखल झाले असून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत तपास सुरू आहे. तिच्या संभाव्य ठिकाणांचा मागोवा घेण्यासाठी पथकाकडून तिच्या नातेवाइकाची मदत घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com