पत्रचाळीतील सदनिकांचा ताबा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत

पत्रचाळीतील सदनिकांचा ताबा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत
Published on

पत्राचाळीतील सदनिकांचा
ताबा घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील उर्वरित ३३ भाडेकरूंना त्यांच्या पुनर्वसन सदनिकांचा ताबा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १७) ३० एप्रिलपर्यंतची मुदत दिली. या मुदतीत भाडेकरूंनी सदनिकांचा ताबा न घेतल्यास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) या सदनिकांचा वापर इतर सार्वजनिक गृहनिर्माण उद्देशांसाठी करण्यास मोकळे असतील, असेही न्यायालयाने नमूद केले.
काही रहिवाशांकडून ताबा घेण्याबाबत सातत्याने दाखवली जाणारी अनिच्छा, मुंबईतील मर्यादित गृहसाठ्याच्या वापरामध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही, असेही न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. मुंबईत घरांची प्रचंड टंचाई असल्यामुळे हे रहिवासी सदनिकांचा ताबा घेण्यास तयार नसतील, तर त्यांना घराची तातडीची गरज नसल्याचे गृहीत धरू, असेही न्यायालयाने म्हटले. तसेच, प्रकल्पबाधित व्यक्ती किंवा सरकारी कर्मचारी यांच्यासह इतर सार्वजनिक गृहनिर्माण उद्देशांसाठी अशा सदनिकांचे वाटप करण्यास न्यायालयाने म्हाडाला परवानगी दिली. तथापि, योग्य ती पूर्वसूचना देऊन, हे सदस्य नंतरच्या काळातही आपल्या सदनिकांचा ताबा घेऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com