

ज्वलनशील रसायनाच्या टँकरचा अपघात
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दीड तास वाहतूक ठप्प
मनोर, ता. १८ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाघोबा खिंड परिसरात शनिवारी सकाळी ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाला. या टँकरमधून रसायनाची गळती सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली. अपघातग्रस्त टँकर सुरक्षितपणे हटवण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक दीड तास रोखण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही वाहिन्यांवर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी वाघोबा खिंड परिसरात रसायनाची वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर उलटला. अपघातानंतर टँकरमधील ज्वलनशील रसायनाची गळती सुरू झाल्याने धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महामार्ग सुरक्षा विभागाने तातडीने अग्निशमन दल, जिल्हा वाहतूक पोलिस, महामार्ग सुरक्षा पथक तसेच रसायन हाताळण्यात तज्ज्ञ असलेल्या कामगारांना घटनास्थळी पाचारण केले. सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. महामार्गावरील वाहतूक रोखल्यानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर काळजीपूर्वक महामार्गावरून हटवण्यात आला. सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर टँकर हटवण्यात यश आले. महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय झाली. टँकर हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.