

शंभर वर्षे जुन्या झाडांचा बळी
वर्सोवा कोस्टल रोड प्रकल्प; शिवसेना ठाकरे गट आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : कोस्टल रोड प्रकल्पात वर्सोवा येथील नाना-नानी पार्कमधील सुमारे २५०हून अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी अनेक झाडे ‘हेरिटेज ट्री’ श्रेणीतील शंभर वर्षे जुनी आहेत. वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड प्रकल्पात जवळपास नऊ हजार झाडांची कत्तल होणार आहे. याविराेधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी वर्सोव्यातील आज नाना-नानी पार्कला भेट देऊन कत्तल होणाऱ्या झाडांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासाेबत शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक होते.
कोस्टल रोड प्रकल्पात वर्सोव्यातील नाना-नानी पार्कमधील १३७ झाडे कापण्यात येणार आहेत. स्थानिकांच्या मते, प्रत्यक्षात उद्यानातील २५०हून अधिक झाडांचा बळी दिला जाणार आहे. तसेच उद्यान ते बांगूरनगरदरम्यान सुमारे ३४८ झाडे तोडली जाणार आहेत. त्यापैकी अनेक झाडे सुमारे शंभर वर्षे जुनी आहेत. ही झाडे ‘हेरिटेज ट्री’ श्रेणीत मोडत असल्याने त्यांना महाराष्ट्र वृक्ष संरक्षण कायद्यांतर्गत विशेष संरक्षण अपेक्षित आहे. वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड प्रकल्पात एकूण नऊ हजार झाडांची कत्तल होणार आहे. त्यापैकी २५०हून अधिक झाडे नाना-नानी पार्कातील आहेत. ही झाडे वाचविण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
-------
मुंबईचा विकास हा सगळ्यांना हवाच आहे; मात्र पर्यावरणाला धोका निर्माण करून विकास खपवून घेणार नाही. मुख्यमंत्री, महापौर, स्थानिक आमदार यांनी येथे प्रत्यक्ष पाहणी करावी. वर्सोवा येथील नाना-नानी पार्क आणि परिसरातील झाडे, कांदळवनांची कापणी करण्यात येणार असून यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण हाेणार आहे.
- किशोरी पेडणेकर, विरोधी पक्षनेत्या, मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.