मराठी चित्रपट आणि नाटक करमुक्त करा

मराठी चित्रपट आणि नाटक करमुक्त करा
Published on

मराठी चित्रपट, नाटक करमुक्त करा!
काँग्रेसची पालिका प्रशासनाकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आगामी काळात मनोरंजन कर वसुलीबाबत भाष्य आल्यानुसार नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे; मात्र ही वाढ योग्य नाही. मराठी चित्रपट आणि नाटकांची संख्या वाढविण्यासाठी त्यांना करमुक्त करण्यात यावे, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे.

नाट्यगृहांचे भाडे वाढविण्यात आले आहे. ही भाडेवाढ अन्यायकारक असून, या भाडेवाढीला काँग्रेस पक्षाचे पालिकेतील गटनेते अशरफ आझमी यांनी विरोध केला. मराठी भाषा, संस्कृती जपण्यासाठी चित्रपट आणि नाटक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नाटक आणि चित्रपट जगविले पाहिजेत, त्यासाठी ते करमुक्त करावे, अशी मागणी गटनेते आझमी यांनी केली आहे. मुंबईतील नाट्यगृहांचे वाढविण्यात आलेले भाडे रद्द करण्याबाबत पालिका प्रशासनाने फेरविचार करावा आणि नाट्य आणि चित्रपट निर्मात्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही गटनेते आझमी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com