फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी समिती सज्ज

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी समिती सज्ज
Published on

फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी समिती सज्ज
अशासकीय संघटना, व्यापारी संघाच्या प्रतिनिधींची नियुक्ती करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः मुंबईतील ३२ हजार फेरीवाल्यांचे पुनर्वसन कुठे करायचे, पालिकेच्या सात झोनमध्ये जागा निश्चित करणे याची जबाबदारी नगर पथविक्रेता समितीची असणार आहे. समितीची निवडणूक नुकतीच पार पडली आणि निकाल जाहीर झाला आहे. आता या समितीमध्ये अशासकीय संघटना, व्यापारी संघाचा प्रतिनिधी आदींची नियुक्ती करण्यात करण्यात येणार आहे.
पुढील १५ दिवसांत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दादर पश्चिमेतील सेनापती बापट मार्ग, दादर उदंचन केंद्र मलनिस्सारण प्रचलन इमारत सहावा मजला या ठिकाणी लेखी अर्ज करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. पालिका क्षेत्रातील पथविक्रेता समितीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात आठ झोनमध्ये सदस्य निवड झाली आहे. समितीवर स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. एकूण २० सदस्य असून, त्यापैकी आठ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित १२ सदस्यांची निवड समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

या गोष्टींची पूर्तता बंधनकारक 
संघटनेची किंवा संघाची, नियम ११ च्या उप - नियम (४) मध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे क्षेत्रातील सक्षम प्राधिकरणाकडून नोंदणी केलेली असावी. संघटना किंवा संघ, मागील तीन वर्षाचे सक्षम प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेले लेखापरीक्षा अहवाल सादर करावेत. संघटनेस किंवा संघास स्थानिक प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकलेले नसावे. संघटना किंवा संघ त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये सिद्धदोषी असणार नाहीत. संघटना किंवा संघ यांना, त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याच्या त्यांच्या प्रवर्गामधील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com