

ससुनवघरपर्यंत खाडीचे रुंदीकरण करा
वसई (बातमीदार) ः अतिवृष्टीमुळे नवघर पूर्वेकडील गोखिवरे, वालीव नवघर (पूर्व), सातीवली येथे असलेल्या औद्योगिक तसेच नागरी वसाहतीत पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यामुळे ससुनवघर खाडीचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी महापौर नारायण मानकर यांनी केली आहे. वसई विरार शहरातील पावसाचे पाणी नवघर पूर्व ते ससुनवघर खाडीमार्फत समुद्राला मिळते. खाडीच्या पूर्व भागात तुंगारेश्वर नदी, पेल्हार, वालीव, सातीवली, गोखिवरे, एव्हरशाईन, वसंतनगरी, नालासोपारा पश्चिम, गास, निर्मळ, सांडोर, सालोली व नवघर-माणिकपूर पश्चिम भागातील पावसाळी पाणी रेल्वे कल्व्हर्ट क्रमांक ७८ मार्गे खाडीला मिळते. विकास आराखड्यात खाडीची रुंदी ४० मीटर आहे; परंतु सद्यःस्थितीत हा नाला पाच ते १० मीटर रुंद असल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.