महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ राज्यस्तरीय चितपत स्पर्धेचा विजेता

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ राज्यस्तरीय चितपत स्पर्धेचा विजेता
Published on

कुस्तीवीरांसोबत अभीष्टचिंतनाचा सोहळा
राज्यस्तरीय चीतपट स्पर्धेचा पृथ्वीराज मोहोळ विजेता

विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) ः झडपोलीतील जिजाऊनगरीत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत २०२५चा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळने अटीतटीच्या लढतीत हिंद केसरी भारत मदनेला चीतपट केले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक नीलेश सांबरे यांच्या ५०व्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त झडपोलीतील जिजाऊनगरीत ही स्पर्धा भरवण्यात आली होती.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील ४०० हून अधिक कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल रांगडा खेळ पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. स्पर्धेत भारत मदने यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तर संग्राम काकडे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्याला २०२६चा महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने मैदानात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती.
----------------------------
५० लाखांची बक्षिसे
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले होते. तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ६० संघ सहभागी झाले होते. यातील आठ संघ मुलींचे आहेत. तसेच राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धाही रंगणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वच खेळाडूंना ५० लाखांहून अधिकची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com