वृक्षांच्या बियांचे संकलन :

वृक्षांच्या बियांचे संकलन :
Published on

पर्यावरणासाठी चिमुकले मैदानात
पालघर जिल्ह्यात ‘सीड बॉल दिवस’ साजरा
कासा, ता. १९ (बातमीदार) ः पर्यावरण संवर्धनास चालना देण्यासाठी पालघर जिल्ह्यात ‘सीड बॉल दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमात तब्बल ३,३९७ शाळांमधील आठ लाख १८ हजार ३६३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या उपक्रमांतर्गत दोन कोटींहून अधिक बीजगोळे (सीड बॉल) तयार करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २५ मार्चला जारी करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी उपयुक्त वृक्षांच्या बियांचे संकलन करून सीड बॉल तयार केले.
तयार करण्यात आलेले सीड बॉल पावसाळ्यापूर्वी डोंगर, माळरान, रिकामी जमीन तसेच वन क्षेत्रात टाकण्यात येणार आहेत. या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने वृक्षलागवड होऊन पर्यावरण संरक्षणास मोठी चालना मिळणार आहे. विशेषतः कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा हा प्रभावी उपाय आहे.
-----------------------------
नियोजनबद्ध कार्यक्रम
२५ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान बियांचे संकलन करण्यात आले. त्यानंतर ६ ते १२ एप्रिलदरम्यान माती, शेणखत, गांडूळ खत यांचे संकलन करून मातीची योग्य तयारी करण्यात आली. १३ ते १७ एप्रिलदरम्यान शाळास्तरावर आवश्यक साहित्य, जागा आणि नियोजन पूर्ण करण्यात आले असून, १८ एप्रिलला विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रत्यक्ष बीजगोळे तयार करण्यात आले आहेत.
---------------------------
उदंड प्रतिसाद
डहाणू तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सीड बॉल तयार केले. जास्तीत जास्त विविध भागांमध्ये सीड बॉल पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनही सहकार्य करीत असल्याचे पर्यावरणप्रेमी शिक्षक दीपक देसले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com