

कुरगाव ग्रामस्थ दुर्गंधीने हैराण
रस्त्यालगत सांडपाणी साचल्याने मनस्ताप
बोईसर, ता. १९ (वार्ताहर) : तारापूर-बोईसर मुख्य रस्त्यालगतच्या राऊळ नगर, मोती नगर, पद्मावती कॉम्प्लेक्स, युनोइया अपार्टमेंट तसेच चापलोट परिसरातील इमारतींचे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जात आहे. या प्रकारामुळे कुरगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ दुर्गंधीने हैराण आहेत.
मुख्य रस्त्यालगत पाणी साचल्याने डबक्यांमध्ये त्याचे रुपांतर झाले आहे. या ठिकाणी म्हशींचा वावर असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. प्रशासन, विकासकांच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
----------------------
कुरगावमधील सांडपाण्याच्या समस्येची दखल घेतली असून, कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी नियोजन सुरू आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
- कमलेश संखे, ग्रामविकास अधिकारी, कुरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.