

वसई-विरारच्या विकासाला गती
विशेष समित्यांची पालिका आयुक्तांकडून घोषणा
विरार, ता. १९ (बातमीदार)ः वसई-विरार पालिका क्षेत्रातील विकासकामांना गती देण्यासाठी तसेच प्रशासकीय कामात पारदर्शकतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने वसई-विरार पालिकेच्या नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी विशेष समित्यांची स्थापना केली आहे.
वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे शहराला विविध समस्याही भेडसावत आहेत. या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र, प्रकल्पादरम्यान गैरप्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.त्यामुळे पालिकेच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी अंदाजपत्रक समिती, निविदा समिती, शहर सौंदर्यीकरण समिती तसेच शहरी वाहतूक सुधारणा समिती गठित केली आहे. या समितींमार्फत शहराचे सुशोभीकरण, वाहतूक व्यवस्था, निविदा प्रक्रिया, प्रकल्पांचे अंदाजपत्रक अशा बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
=================================
अंदाजपत्रक समिती
शहरात विविध प्रकारचे प्रकल्प राबविले जातात. विकासकामांचा खर्च, तांत्रिक आरखडा तपासून घेण्यासाठी ही समिती तयार केली आहे. ही समिती तांत्रिक त्रुटींची तपासणी करणे, विकासकामाचे दर, अंदाजपत्रकांची तपासणी करणार आहे.
===================================
निविदा समिती
निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निविदा समितीची गठित करण्यात आली आहे. कामासाठी कंत्राटदारांची निवड करताना पारदर्शकता राखणे, निविदांमधील अटी-शर्तींची पडताळणी करणे आणि योग्य कंत्राटदाराची निवड समितीकडून होणार आहे.
==============================
शहर सौंदर्यीकरण समिती
शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी प्रसन्न वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने शहर सौंदर्यीकरण समिती स्थापन केली आहे. मुख्य चौक, उड्डाणपुलांखालील जागा, उद्याने, दुभाजकांचे सौंदर्यीकरण सामाजिक संस्था, विकासक, वास्तुविशारदांच्या मदतीने सुशोभिकरण होणार आहे.
===============================
वाहतूक सुधारणा समिती
वाढती वाहतूक कोंडी सर्वात मोठी समस्या आहे. यावर उपाय शोधण्यासाठी विशेष शहरी वाहतूक सुधारणा समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती प्रवास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, पदपथ, रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये जा करण्याचे मार्ग, रस्त्यांचे नियोजन करणार आहे.
========================================
मुंबई महानगरालगतचे वसई-विरार शहर विकसित होत आहे. त्यामुळे पालिकेची कार्यपद्धती योग्य असणे गरजेचे असल्याने समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
- पृथ्वीराज बी. पी., आयुक्त, पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.