दारू न पिणाऱ्यांनाही चरबीयुक्‍त यकृताचा आजार

दारू न पिणाऱ्यांनाही चरबीयुक्‍त यकृताचा आजार
Published on

दारू न पिणाऱ्यांनाही चरबीयुक्‍त यकृताचा आजार
केईएम रुग्णालयातील नॅश क्लिनिकमध्ये दररोज सरासरी एक रुग्णाचे निदान
मुंबई, ता. १९ : दारूला यकृताचा सर्वात मोठा शत्रू मानले जाते. दारूच्या अतिसेवनामुळे चरबीयुक्‍त यकृत होऊन पुढे गंभीर आजारांमध्ये रूपांतर होऊ शकते. मात्र, तज्ज्ञांच्या मते आता दारू न पिणाऱ्या व्यक्तींमध्येही चरबीयुक्‍त यकृताच्या आजाराचे प्रमाण गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
केईएम रुग्णालयात दररोज अशाप्रकारच्या सरासरी एका रुग्णाचे निदान होत आहे. बदलती जीवनशैली आणि अयोग्य आहार पद्धतीचा थेट परिणाम यकुताच्या आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. केईएम रुग्णालयातील ‘नॅश क्लिनिक’मध्ये आतापर्यंत शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५७३ रुग्णांमध्ये चरबीयुक्‍त यकृत आढळून आले आहे. म्हणजेच क्लिनिक सुरू झाल्यापासून दररोज किमान एका रुग्णामध्ये या आजाराची पुष्टी होत आहे.

केईएम रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आकाश शुक्ला यांनी सांगितले की, पूर्वी या आजाराचा संबंध मुख्यत्वे मद्यपानाशी जोडला जात होता. मात्र, सध्याच्या घडीला चरबीयुक्‍त यकृत आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामागे चुकीची जीवनशैली, जंक फूडचे वाढते सेवन, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत.
तज्ज्ञांच्या मते, केवळ वजन कमी करण्यावर भर न देता एकूण चयापचय आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून यकृताचे संरक्षण करता येईल.

प्रत्येक तिसरा प्रौढ बाधित
भारतामधील २३,५०० हून अधिक प्रौढांवर आधारित विश्लेषणानुसार सुमारे ३८.६ टक्के लोकांमध्ये चयापचय बिघाडाशी संबंधित यकृत विकार आढळून आले आहे.
उच्च जोखमीच्या गटात लठ्ठपणा, मधुमेह हे प्रमाण ५२.८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सुमारे ४०.८ टक्के रुग्ण चरबीयुक्‍त यकृताने प्रभावित आहेत.

वेळीच उपाययोजनांची गरज
भारतामध्ये चरबीयुक्‍त यकृत हा वेगाने वाढणारा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनत आहे. विशेषतः शहरी जीवनशैली, वाढता लठ्ठपणा आणि मधुमेह ही प्रमुख कारणे आहेत. वेळेत उपाययोजना न केल्यास हा आजार गंभीर विकारात परिवर्तित होऊ शकतो, असे गॅस्ट्रोएंटरोलॉजी विभागप्रमुख डाॅ. आकाश शुक्ला यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com