

अवैध गुटखा विक्रीप्रकरणी एकाला अटक
खालापूर (बातमीदार) ः शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणारा राजेश पान शॉप टपरीचालकाला खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. राजेश पान टपरीमध्ये विनापरवाना गुटखा विक्री होत असल्याची माहिती खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (ता. १७) टपरीवर छापा टाकला. त्या वेळी पाच हजार ५२६ रुपये किमतीचा गुटखा सापडला असून टपरीचालकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत खोपोली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एन. गागरे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.