कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची रणधुमाळी;

कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची रणधुमाळी;
Published on

कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची रणधुमाळी
सहा जागांपैकी चार बिनविरोध, दोन जागांवर २८ एप्रिलला थेट मतदान
कर्जत, ता. १९ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील सहा रिक्त जागांपैकी चार जागांवर बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित दोन जागांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
तालुक्यातील अंभेरपाडा, दहिवली तर्फे वरेडी, गौरकामथ आणि पाली तर्फे कोथल खलाटी या चार ग्रामपंचायतींमध्ये एकूण सहा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये अंभेरपाडा ग्रामपंचायतीत गोदाबाई काठे (काठेवाडी खांडस) यांची बिनविरोध निवड झाली आहे. दहिवली तर्फे वरेडी येथे शिवाजी मिसाळ (वंजारपाडा) यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर, गौरकामथ ग्रामपंचायतीत सुमन वाघमारे आणि पाली तर्फे कोथळखलाटी ग्रामपंचायतीत दीक्षा देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे.

दोन जागांसाठी थेट लढत
तर, पाली तर्फे कोथळखलाटी ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक १ मध्ये दोन जागांसाठी थेट लढत रंगणार आहे. सर्वसाधारण महिला जागांसाठी स्नेहा देशमुख आणि श्रुती दळवी यांच्यात हा सामना होणार आहे, तर सर्वसाधारण जागेसाठी आशीष देशमुख आणि मयूर देशमुख यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान २८ एप्रिल रोजी होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com