

जेएनपीए परिसरातील कंटेनर यार्डमध्ये भीषण आग
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : जेएनपीए बंदर परिसरातील गव्हाण फाटा येथील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमधील गोदामाला शनिवारी (ता. १८) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत धोकादायक रसायनांचा स्फोट झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तचे नुकसान झाले आहे.
जेएनपीए बंदर परिसरात ठिठिकाणी कंटेनर यार्ड तयार करण्यात आले आहेत. त्यातीलच गव्हाण फाटा येथील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमधील गोदामाला शनिवारी दुपारी आग लागली. आगीने काही क्षणातच विक्राळ रूप धारण केल्याने धुराचे प्रचंड लोट उसळताना दुरवरून दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच पनवेल, उरण, ओएनजीसी आणि जेएनपीटी येथून १० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत जवानांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आग लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने गोदामातील व परिसरातील कामगारांनी बाहेर धाव घेतल्यामुळे जीवितहानी टळली. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचेदेखील अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.