२०० संविधान प्रतिंचे वितरण

२०० संविधान प्रतिंचे वितरण
Published on

संविधान प्रतींचे मोफत वितरण

भिवंडी (वार्ताहर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत भिवंडीत सुप्रिया स्वाधार महिला सामाजिक संस्थेतर्फे २०० संविधान प्रतींचे मोफत वितरण करून महामानवाला अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भिवंडीत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धामणकर नाका येथे हजारो भीमसैनिक, आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते. या वेळी शोभायात्रेत सहभागी सर्वधर्मीय नागरिकांचे स्वागत संस्थेच्या अध्यक्षा स्वाती कांबळे यांनी संविधानाच्या प्रती भेट देऊन केले. जगाला माहीत आहे की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली आहे, पण आजही भारतीयांना या राज्यघटनेमुळे आपल्याला कोणते हक्क व अधिकार मिळाले याची जाणीव नाही. तीच जाणीव करण्यासाठी व जनजागृती करण्याचा हेतू ठेवून राज्यघटनेच्या प्रती भेट दिल्याची माहिती स्वाती कांबळे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com