

आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबरनाथ (वार्ताहर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आव्हान सेवाभावी सामाजिक संस्था व संघमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी, दंतचिकित्सा, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी आदी विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सुमारे १०० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या वेळी माजी नगरसेवक रवींद्र पाटील, संघमित्रा बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रमोद बच्छाव, सचिव सुरेश मोरे, उपाध्यक्ष राहुल शिरसाट, प्रफुल निकम, प्रकाश शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मधु डेंटल क्लिनिकचे डॉ. महेश किनीकर व फोर्टिस हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन आव्हान सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल गोवर्धन मोरे यांनी केले. परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.