

नियमबाह्य स्कूल बसवर आरटीओची कारवाई
१६८ बसांवर दंडात्मक कारवाई; ६७.८९ लाखांची वसुली
वाशी, ता. २० (बातमीदार) : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसचालकांविरोधात नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. १ एप्रिल २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण १३८५ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १६८ स्कूल बसवर कारवाई करत ६७ लाख ८९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्य शासनाने शालेय वाहतुकीतील अपघात टाळण्यासाठी स्वतंत्र धोरण आखत कडक नियमावली लागू केली आहे. त्यानुसार बसचा रंग पिवळा असणे, चालकाकडे किमान पाच वर्षांचा अनुभव व वैध बिल्ला असणे आवश्यक आहे. तसेच बसमध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, थांबे, रक्तगट आदी तपशील ठेवणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सहाय्यकाची नेमणूकही आवश्यक करण्यात आली आहे.
मात्र, प्रत्यक्षात अनेक बसचालकांकडून या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून आले आहे. १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने वापरणे, आवश्यक कागदपत्रांचा अभाव व सुरक्षाविषयक त्रुटी ही उल्लंघनांची प्रमुख कारणे आहेत. आरटीओकडून नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जात असली, तरी नियमांचे पालन अधिक काटेकोरपणे होणे गरजेचे असल्याचे चित्र आहे.
कोट
स्कूल बसच्या नियंमाचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनचालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पाहणी करून कारवाई करण्यात येत आहे.
- गजानन गावंडे, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.