तळवली येथे गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा

तळवली येथे गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा
Published on

तळवली येथे गोरोबाकाका पुण्यतिथी सोहळा
रोहा, ता. १९ (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र तळवली येथे संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी बुधवारी (ता. १५) भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
स्वर्गीय सद्गुरूवर्य अलिबागकर महाराज, धोंडूबाबा कोलाटकर व गोपाळ बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच हभप गुरूवर्य दत्तू महाराज कोलाटकर (मठाधिपती, पंढरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
या वेळी देवतांचे अभिषेक व पूजाविधी, कलशस्थापना, ध्वजारोहण, वीणा पहारा व भजन, हभप मदन महाराज कोलाटकर यांची पुष्पवृष्टीपर कीर्तन सेवा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हभप तुकाराम महाराज महाडिक यांचे प्रवचन, सामुदायिक हरिपाठ, त्यानंतर हभप भूषण महाराज वरखले यांची कीर्तन सेवा व जागर भजन असे विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com