

हिंदू संमेलनात श्रीराम स्तोत्र पठण
कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेत प्रकाश लेले यांच्या अध्यक्षतेखाली सुभेदारवाडा प्रांगणात हिंदू संमेलन पार पडले. या वेळी अभिराम वैशंपायन या अवघ्या सहा वर्षांच्या मुलाने भगवद्गीतेतील १२वा अध्याय निर्भिडपणे उपस्थिताना बोलून दाखवला. तसेच या वेळी महिला मंडळाने अत्यंत तालबद्धरीत्या श्री रामनाम जपमाळ वैखरीत व स्तोत्र पठण केले. या संमेलनासाठी धर्म जागरण प्रांत संयोजक राजेश कुंटे आणि राष्ट्रसेविका समिती कोकण प्रांत सहकार्यवाहिका पद्मजा अभ्यंकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक अमित धाक्रस व कल्याण जनता बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा संपदा कुलकर्णी यादेखील उपस्थित होत्या. संत, देशभक्तांच्या वेशभूषेत लहान मुलांनी आत्मविश्वासाने व्यासपीठावर संचलन करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रकाश लेले यांनी या संमेलनासाठी उपस्थित असलेल्या हिंदू समुदायाचे आभार मानले.