

आयडियल विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
कल्याण (वार्ताहर) : हाजीमलंग रोड, भाल गाव येथील सीबीएसई संलग्न आयडियल इंग्लिश विद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक उत्कृष्टतेचा मान राखत दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल मिळवला आहे. सलग मिळणाऱ्या या यशामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत शाळेची बांधिलकी जोपसलेली आहे.
यावर्षीच्या निकालात विधी मिश्रा हिने ९४ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आयांश गौर आणि अथर्व एच. तिवारी यांनी प्रत्येकी ९० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. तृष्णा रियाने ८८ टक्के, तेजस जयसवालने ८७ टक्के, तर अनन्या रायपुरेने ८६ टक्के गुण मिळवत शाळेचा गौरव वाढविला. शाळेचे सहसचिव विजय उपाध्याय यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य मुकुंदा यांनी या यशाचे श्रेय शिक्षकांच्या परिश्रमांना, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि पालकांच्या सहकार्याला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.