खारआंबोली कालव्याच्या कामाला गती

खारआंबोली कालव्याच्या कामाला गती
Published on

खारआंबोली कालव्याच्या कामाला गती
शेतकऱ्यांच्या सहकार्याने मेअखेर पूर्णत्वाची अपेक्षा
मुरुड, ता. १९ (बातमीदार) : आंबोली धरण लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत खारआंबोली उजवा व डावा तीर कालव्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती मिळाली आहे. मार्च २०२५ पासून पाटबंधारे विभागाने प्राधान्याने काम हाती घेतले असून, शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास मे २०२६ अखेर कालव्याचे काम पूर्ण होईल, अशी खात्री अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
१० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. कालवा पूर्ण झाल्यास सुमारे ६०० हेक्टर जमीन दुबार पिकाखाली येणार असून, उन्हाळी भातशेतीसह भाजीपाला, कडधान्ये, फळपिके घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे.
सध्या उजवा तीर कालवा सुमारे पाच कि.मी., तर डावा तीर कालवा दोन कि.मी. पूर्ण झाला आहे. आंबोली धरणामुळे मुरूड शहरासह १२ गावांना पिण्याचे पाणी मिळत असले तरी कालव्याअभावी शेतीला पाणी मिळत नव्हते. रब्बी हंगामात पाण्याअभावी शेतकरी उन्हाळी भात घेऊ शकत नव्हते.
दरम्यान, ‘ओपन पाइप डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क’ या नव्या धोरणानुसार बंदिस्त पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, यामुळे पाण्याचा थेट पुरवठा होणार आहे.

कोट :
कालव्याचे काम पूर्ण झाल्यास शेतीला चालना मिळेल आणि स्थानिक युवक शेतीकडे वळतील.
– मनोज कमाने, प्रगतिशील शेतकरी

चौकट
सिंचनामुळे शेतीत बदल
कालवा पूर्ण झाल्यास भातशेतीबरोबरच भाजीपाला, फळपिके, कडधान्ये यांचे उत्पादन वाढेल. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व कृषी पर्यटनासारख्या पूरक व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.

बॉक्स
शेतकऱ्यांच्या सहकार्याची गरज
कालव्याकरिता जमिनीखाली पाइपलाइन टाकली जात असल्याने नुकसान होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र नुकसानभरपाईच्या अपेक्षेमुळे काही ठिकाणी विरोध दिसून येत आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com