भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा

भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा
Published on

वाडा खडकोनामध्ये जन्मोत्सव सोहळा

पालघर, ता. १९ ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोरनजीकच्या वाडा खडकोना येथील श्री गोमतेश्वरी अंबाधाम मंदिर (भगवान परशुराम व रेणुका मंदिर) परिसरात रविवारी भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. या वेळी शस्त्र, शास्त्र यांची सांगड घालणाऱ्या भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.
उत्सवाच्या दिवशी सकाळी भगवान परशुरामांचे पूजन, अभिषेक केल्यानंतर आरती, पारंपरिक पालखी मिरवणूक सोहळ्याला सुरुवात झाली. ही मिरवणूक भगवान परशुराम मंदिरापासून सुरू होऊन गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत पुन्हा मंदिर परिसरात आली. याचदरम्यान भजन आणि प्रबोधनात्मक प्रवचन झाले. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com