फळविक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

फळविक्रेत्यावर कोयत्याने हल्ला
Published on

अंबरनाथ, ता. १६ (वार्ताहर) : शहराच्या पश्चिमेतील भाजी मार्केट परिसरात फळविक्रीच्या जागेच्या वादातून फळविक्रेत्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अकबर अली अब्दुल शेख (४१) हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, फरार संशयिताचा पोलिस शोध घेत आहेत.

शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २०१५-१६मध्ये अंबरनाथ पश्चिम येथील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये फळविक्रीची जागा धीरज परमाल यांच्याकडून अडीच लाख रुपये देऊन विकत घेतली होती. सध्या ही जागा रणजीत नावाच्या व्यक्तीस भाडेतत्त्वावर दिली आहे. १४ एप्रिलला धीरजचा मुलगा आदित्यने त्या ठिकाणी जाऊन जागा रिकामी करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या रणजीत यांनी ही माहिती शेख यांना सांगितली. त्यानंतर १५ एप्रिलच्या रात्री आदित्य हा दोन व्यक्तींसह पुन्हा त्या ठिकाणी आला. या वेळी आदित्य आणि शेख यांच्यात वाद झाला तसेच या वेळी हा हमरीतुमरी वाढल्याने आदित्यने कोयत्याने शेख यांच्यावर हल्ला केला. त्याच्या साथीदारांनीही कोयत्याने मारहाण करीत शेख यांच्यावर वार केले. जखमी शेख यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आदित्य व त्याच्या साथीदारांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com