शहापुरातील आठ आरएमसी प्रकल्पांना टाळे

शहापुरातील आठ आरएमसी प्रकल्पांना टाळे
Published on

शहापूर (वार्ताहर) : तालुक्यातील आसनगाव आणि वासिंद गावात सुरू असलेल्या आणि बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट काँक्रीटचे तयार मिश्रण पुरविणाऱ्या आरएमसीच्या आठ प्रकल्पांना महसूल विभागाच्या भरारी पथकाने टाळे ठोकले आहे. या प्रकल्पांची तपासणी केली असता, कागदपत्रांचा अभाव आणि अनियमितता आढळून आल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच काही प्रकल्प विनापरवानादेखील सुरू असल्याचे व त्यांच्याकडे आवश्यक नोंदी नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी सांगितले की, टाळे ठोकण्यात आलेल्या रेडीमिक्स, आरएमसी प्रकल्पधारकांना कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विक्री परवाना, साठा नोंदवही तसेच इतर आवश्यक मंजुरी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत व त्यानंतरच हे प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकणार आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com