

म्हाडाच्या कोकण मंडळात कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण
अनेक पदे रिक्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : म्हाडाच्या कोकण मंडळात सध्या अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. मंडळासाठी एकूण १५६ पदे मंजूर असताना केवळ ९४ कर्मचारी आहेत, त्यापैकी १२ कर्मचारी म्हाडाच्या इतर मंडळांमध्ये सेवा वर्ग अंतर्गत कार्यरत असल्याने एका कर्मचाऱ्यावर दोन-दोन टेबलच्या कामाचा भार पडत असल्याने वेळेत काम कसे पूर्ण करणार, असा सवाल कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
मुंबई मंडळाच्या बरोबरीने कोकण मंडळाकडून सातत्याने लाॅटरी काढली जात असून, त्यांच्या मालमत्ताही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे उपलब्ध मालमत्तांचे भाडे वसूल करणे, नव्याने काम सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची उभारणी करणे, घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढणे, विजेत्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतानाच त्यांना घराचा ताबा देणे, अशी वेगवेगळी कामे करावी लागतात. त्यासाठी कोकण मंडळाकरिता म्हाडा प्राधिकरणाने १५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे मंजूर केली होती; मात्र सेवानिवृत्ती, इतर ठिकाणी सेवा वर्ग करणे आदी बाबींमुळे कर्मचारी कमी झाले आहेत. रिक्त असलेल्या पदांमध्ये सहाय्यक कर्मचारी, लिपिक, वरिष्ठ लिपिक अशी पदे असल्याचे कोकण मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.