घरगुती वादातून पत्नीवर कोयत्याने हल्ला

घरगुती वादातून पत्नीवर कोयत्याने हल्ला
Published on

कल्याण, ता. १९ (वार्ताहर) : अटाळी-आंबिवली परिसरात घरगुती वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आंबिवली पश्चिमेतील संतोषी माता नगर येथे ३५ वर्षीय महिला वास्तव्यास आहेत. अनिल राजाराम धोत्रे (वय ४०) हा त्यांचा पती असून संशयातून वारंवार त्रास दिला आहे. यापूर्वीही त्याने पत्नीला दांडक्याने मारहाण केली होती. त्यावेळी त्या खडकपाडा पोलिस ठाण्यात गेले असता नवरा-बायकोचा वाद म्हणून समज देऊन त्यांना सोडण्यात आले होते. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून, तसेच संशयातून त्याने रात्रीच्या वेळी संतापाच्या भरात कोयत्याने डोके, कानाच्या जवळ वार करत गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com