निजामपूर मंडळात महसूल शिबिर

निजामपूर मंडळात महसूल शिबिर
Published on

निजामपूर मंडळात महसूल शिबिर
विविध दाखल्यांचे वाटप
माणगाव, ता. १९ (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत निजामपूर मंडळात १८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळातील ३५ गावांतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत विविध दाखले व योजनांचा लाभ मिळविला.
या शिबिरात उत्पन्न, जाती, डोमासाईल व वय अधिवास असे एकूण १३२ दाखले, आठ जन्म दाखले, २७ फेरफार निर्गतीकरण, ३० वारस नोंदी तसेच सातबारा वाटप करण्यात आले. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेंतर्गत ४५ अर्ज दाखल होऊन २० लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आले. लक्ष्मी मुक्ती योजनेत दोन महिलांना लाभ देण्यात आला.
याशिवाय सातबारा दुरुस्ती, ई-केवायसी, अग्री स्टॅक मंजुरी, आधार अपडेट व १०० आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले. कृषी विभागाकडून १ ट्रॅक्टर व २ ग्रास कटरचे वाटप, तसेच आरोग्य तपासणीही करण्यात आली.
सदर शिबिराचे आयोजन निजामपूर मंडळ अधिकारी विद्या अंकुश साळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप, तहसीलदार विपिन लोकरे, नायब तहसीलदार अरविंद घेमूड, सुधीर यादव, राहुल शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले. यासाठी ग्राम महसूल अधिकारी मारुती चाटे, आकाश पवार, कमलेश चौखे, सुनील टेळे, तन्मय देसाई, सुकेशिनी राक्षसमारे तसेच महसूल सेवक गणेश रसाळ, जनार्दन कदम, रोशन खरस, बाळाराम कदम, गोविंद गुळंबे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com