सानपाड्यात स्मार्ट मीटरविषयी जनजागृती मोहीम

सानपाड्यात स्मार्ट मीटरविषयी जनजागृती मोहीम
Published on

सानपाड्यात स्मार्ट मीटरविषयी जनजागृती मोहीम
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : स्मार्ट मीटर बसविण्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी सानपाडा परिसरातील रहिवाशांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल वाढल्याच्या तक्रारी विविध ठिकाणी समोर आल्याने नागरिक साशंक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कायदेशीर स्थिती स्पष्ट करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
या उपक्रमात १ एप्रिल २०२६ला केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेचा संदर्भ देत मीटर स्थापनेबाबतचे नियम नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. वीज कायदा २००३अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या नियमांमध्ये स्मार्ट मीटर सक्तीचे असल्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक तांत्रिक सुविधा, नेटवर्क उपलब्धता यानुसार मीटर बसविण्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मोहिमेतून दिली जात आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
सक्ती नसल्याचा दावा
मोहिमेनुसार स्मार्ट मीटर बसविणे सर्वांसाठी बंधनकारक नसून, परिस्थितीनुसार निर्णय घेतला जातो. जबरदस्ती होत असल्यास ग्राहकांना माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत लेखी आदेश मागण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com