

अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाइन
संकेतस्थळावर नोंदणी सुरू
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाही पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षण संचालनालयाने केली आहे. त्यानुसार १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून प्रवेश अर्जाच्या भाग-१ भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरता येणार असून, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यंदाही केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे कॅप (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना दहावीतील गुणांच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाईल.
अर्ज प्रक्रियेत नोंदणी, भाग-१ भरणे, अर्ज प्रमाणित करणे आणि निकालानंतर भाग-२ मध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवणे हे टप्पे असणार आहेत. विद्यार्थ्यांना किमान १ ते कमाल १० महाविद्यालयांची निवड करता येणार आहे.
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विद्यार्थी व पालकांनी वेळेत अर्ज भरावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.