

नवी मुंबईत क्षमतावृद्धी कार्यशाळा
‘सुपर स्वच्छ लीग’ मानांकन टिकवण्यासाठी दिशा
वाशी, ता. १९ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षणात देशातील अग्रस्थानी राहून ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये स्थान मिळवलेल्या नवी मुंबईने हे मानांकन कायम राखण्यासाठी स्वच्छता अधिकाऱ्यांसाठी विशेष क्षमतावृद्धी कार्यशाळा आयोजित केली. महापालिकेच्या मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात पार पडलेल्या या कार्यशाळेत स्वच्छता अधिकारी, निरीक्षक व उपनिरीक्षक सहभागी झाले.
अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी ‘सुपर स्वच्छ शहर’ म्हणून ८५ टक्क्यांहून अधिक गुणांकन मिळवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत सिटी प्रोफाइल घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. कचऱ्याचे ओला, सुका व घातक अशा प्रकारांत स्त्रोतावरच वर्गीकरण वाढविणे, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि लिटर बिन्सची नियमित देखभाल यावर भर देण्यात आला. ‘सुगंधी अंगण’ अभियानाचा विस्तार, नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता तसेच प्लास्टिक वापरावर नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पावसाळ्यापूर्व नालेसफाई, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी आणि ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत इतर शहरांना मार्गदर्शनाची जबाबदारीही अधोरेखित करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.