

वाहतूक कोंडी सुटणार!
ठाणे स्टेशन परिसरातील मार्गात बदल
ठाणे शहर, ता. १९ (बातमीदार) ः ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. वाहतूक विभागाकडून त्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर ३० दिवसांसाठी स्टेशन परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी वाहतुकीत बदल केला आहे. यावर वाहतूक विभागाने नागरिकांच्या हरकतीसुद्धा मागवल्या असून, त्यानुसार पुढील निर्णय कायम होणार आहे.
ठाणे स्टेशन परिसर अत्यंत गजबजलेला असतो. दररोज लाखोंच्या संख्येने नागरिक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे येथे नहमी वाहतूक कोंडी होत असते. याबाबत नागरिकांच्या तक्रारीही आहेत. या तक्रारींची दखल घेत नौपाडा वाहतूक विभागाने नौपाडा भागातील वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या परिसरात ३० दिवसांकरिता प्रायोगिक तत्त्वावर काही बदल करण्यात आले आहेत. १८ एप्रिलपासून पुढील ३० दिवस हे बदल असणार आहेत. या बदलाबद्दल नागरिकांच्या अथवा इतर कोणाच्या काही हरकती, सूचना असतील तर त्यांनी तीन हात नाका येथील वाहतूक कार्यालयात नोंदवाव्यात, असे नौपाडा विभागाच्या प्रमुख गौरी मोरे यांनी आवाहन केले आहे.
असे आहेत बदल...
गोखले रोड, महर्षी कर्वे रोड येथून बेडेकर रुग्णालयाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोखले रोडजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने गोखले रोडने गावदेवी मैदानमार्गे वाहतूक करतील. हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या नाहीत तर हे वाहतूक बदल पुढील आदेश येईपर्यंत कायमस्वरूपी राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.