

१२ तासांनंतर आगीवर नियंत्रण
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : जेएनपीए बंदर परिसरातील गव्हाणफाटा येथील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमधील कंटेनर यार्डमध्ये शनिवारी भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करीत १२ तासानंतर रविवारी पहाटे ३ वाजेपर्यंत येथील आग नियंत्रणात आणली. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अगीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जेएनपीए बंदर परिसरात ठीकठिकाणी कंटेनर यार्ड तयार करण्यात आले आहेत. त्यातीलच गव्हाणफाटा येथील जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमधील गोदामाला शनिवारी दुपारी आग लागली. आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गोदाम आणि परिसरातील शेकडो कामगारांनी घाबरून बाहेर धाव घेतली. आगीमुळे आकाशात धुराचे प्रचंड लोट उसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल, उरण, ओएनजीसी आणि जेएनपीटी येथून १० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या आगीत गोदामातील अनेक कंटेनर्स आगीच्या भक्षस्थानी पडले असून, नेमके किती कंटेनर्स या आगीत जळाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.