‘बिग बॉस मराठी ६’ची विजेती तन्वी कोलते

‘बिग बॉस मराठी ६’ची 
विजेती तन्वी कोलते
Published on

‘बिग बॉस मराठी ६’ची
विजेती तन्वी कोलते
मुंबई, ता. १९ : शंभर दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ या रिअ‍ॅलिटी शोची दिमाखात सांगता झाली आहे. या पर्वाच्या महाविजेतेपदावर तन्वी कोलते हिने आपले नाव कोरले आहे. मुंबईत झालेल्या भव्य समारंभात रविवारी (ता. १९) तिला विजेती घोषित करण्यात आले.

तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास मैत्री, संघर्ष, वाद आणि खेळाप्रती असलेल्या जिद्दीसाठी विशेष गाजला. कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत राहून आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप उमटवण्यात तन्वी यशस्वी ठरली. ‘या घरामुळे मला स्वतःची खरी ओळख उमजली आणि कठीण प्रसंगात ठाम राहण्याची ताकद मिळाली. सुरुवातीच्या काळात ओळख मिळवण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले,’ अशी भावना तिने विजेतेपदानंतर व्‍यक्त केली. तसेच या यशाचे संपूर्ण श्रेय तिने कुटुंब आणि चाहत्यांना दिले आहे.
तन्वीला कलर्स मराठीकडून १५ लाख रुपयांची धनराशी आणि मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे १० लाख रुपयांचे डायमंड ज्वेलरी खरेदीसाठीचे वाउचर आणि तुनवाल ई-मोटर्सची ई-बाइक बक्षीस म्हणून देण्यात आली. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रितेश देशमुख आणि त्याच्या आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊनही तिला गौरवले. या पर्वाबाबत जिओस्टार मराठी क्लस्टरचे ईव्हीपी सतीश राजवाडे म्हणाले, ‘यंदाचा सिझन अनेक अनपेक्षित वळणांमुळे आणि सदस्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे यशस्वी ठरला. तन्वीने खेळात दाखवलेले सातत्य आणि प्रेक्षकांशी घट्ट झालेले नाते तिला विजयापर्यंत घेऊन गेले.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com