केईएम रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राची यशस्वी सुरुवात

केईएम रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राची यशस्वी सुरुवात
Published on

केईएम रुग्णालयातील आयव्हीएफ केंद्राची यशस्वी सुरुवात
आययूआय पद्धतीने १२ वर्षांनंतर महिलेला गर्भधारणा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात नुकत्याच सुरू झालेल्या आयव्हीएफ केंद्रातून पहिल्याच टप्प्यात आशादायक चित्र समोर आले आहे. आययूआय (इंट्रा युटेरियन इनसेमिनेशन इंट्रायुटेरियन) पद्धतीच्या सहाय्याने एका ३३ वर्षीय महिलेला लग्नाच्या तब्बल १२ वर्षांनंतर प्रथमच गर्भधारणा झाली.
रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, वंध्यत्व उपचाराच्या प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने उपचार केले जातात. सुरुवातीला औषधांच्या मदतीने अंडोत्सर्जन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरही यश न आल्यास आययूआय पद्धतीचा अवलंब केला जातो. यामध्ये शुक्राणू थेट गर्भाशयात सोडले जातात. या प्रक्रियेमुळे काही अडथळे दूर होऊन गर्भधारणेची शक्यता वाढते.
केईएममधील या नव्या केंद्रात आतापर्यंत १४ महिलांनी आयव्हीएफसाठी नोंदणी केली असून, या बहुतेक महिला पूर्वी इतर उपचारांमध्ये अपयशी ठरलेल्या किंवा वाढत्या वयासह इतर वैद्यकीय गुंतागुंती असलेल्या आहेत. त्यामुळे पुढील उपचार प्रक्रिया आव्हानात्मक असणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
नेक जोडपी शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती किंवा राहण्याच्या समस्या अशा विविध कारणांमुळे गर्भधारणा पुढे ढकलतात. मात्र योग्य वयात आणि योग्य वेळी उपचार न घेतल्यास वंध्यत्वाची समस्या अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. गर्भधारणा हवी असूनही दीर्घकाळ यश मिळत नसेल, तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे केईएमच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. पद्मजा सामंत यांनी सांगितले.

सवलतीच्या दरात उपचार
खासगी रुग्णालयांच्या तुलनेत या केंद्रात सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून, औषधांचा खर्च २० ते ३० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. मात्र एकूण उपचार खर्च खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी ठेवण्याचा प्रयत्न असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खासगी रुग्णालयामधील आयव्हीएफ केंद्रामध्ये कृत्रिम गर्भधारणेसाठी साधारणपणे दोन ते अडीच लाख खर्च येतो. मात्र केईएममधील या केंद्रामध्ये उपचारांसाठी येणाऱ्या जोडप्यांना माफक दरामध्ये सुविधा पुरवल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात आणि एका महिन्यात आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, एका महिलेला आययूआय पद्धतीने गर्भधारणा झाली आहे.
- डॉ. संगीता रावत, अधिष्ठात्री, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com