

कंत्राटी कामगारांसाठी आनंदवार्ता
सेवेत कायम करण्यासाठीच्या हालचालींना वेग
विरार, ता. २० (बातमीदार)ः वसई-विरार शहर पालिकेत अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत. पालिकेच्या मुख्य आस्थापनेवर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.
वसई-विरार पालिकेचा ५० टक्के डोलारा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावर उभा आहे. पालिकेत एकूण कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी कायमस्वरूपी सेवेत आहेत, तर उर्वरित ५० टक्के ठेका पद्धतीवरील कर्मचारी आहेत. सद्दःस्थितीत पालिकेत २,२०० कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये वैद्यकीय आरोग्य विभागातील ४०० कर्मचाऱ्यांचा समावेश असून, उर्वरित १,७०० हून अधिक कर्मचारी बाह्ययंत्रणेद्वारे विविध विभागांत सेवा देतात. या कर्मचाऱ्यांच्या अनुभवामुळे त्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी महापौरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. या बैठकीला उपमहापौर मार्शल लोपीस, सभागृह नेते प्रफुल्ल साने, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
-------------------------
सहा महिन्यांच्या करारापासून मुक्ती?
आरोग्य विभागात २०१३ पासून एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, फार्मासिस्ट, परिचारिका कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. या वैद्यकीय कर्मचाऱ्याऱ्यांचे कंत्राट दर सहा महिन्यांनी नव्याने तयार केले जाते. ज्यामुळे त्यांच्या नोकरीवर अनिश्चिततेची टांगती तलवार असते. अशा वैद्यकीय पथकाला पालिकेच्या मुख्य आस्थापनेवर कायम करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.