खच्चून गाडीत भरतात प्रवाशी

खच्चून गाडीत भरतात प्रवाशी
Published on

प्रवासी वाहतुकीत जीवाशी खेळ
वाड्यात भरधाव गाडी चालवण्याचे प्रकार
वाडा, ता. २० (बातमीदार)ः कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलावरील भीषण अपघातात ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बेकायदा प्रवासी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, वाड्यातही वाहनांचा नंबर लवकर लागावा म्हणून भरधाव गाडी चालवण्याचे प्रकार सुरू आहेत.
वाडा तालुक्यात बेकायदा प्रवासी वाहतुकीला उत आला आहे. तालुक्यात ५०० हून अधिक खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने विविध मार्गावर धावतात. यात कुडूस-अंबाडी, कुडूस-कोंढले, कुडूस-वाडा, कुडूस-खानिवली, कुडूस- देवघर, वाडा-विक्रमगड,वाडा- सोनाळे, वाडा-परळी, वाडा-मनोर, वाडा-उज्जैनी, वाडा-खानिवली, वाडा-जव्हार, खानिवली-गोऱ्हे, कंचाड- पाचमाड मार्गावर वाहतूक करीत असतात. या गाडीत पाच प्रवासी क्षमताना असताना १० ते ११ प्रवासी भरले जातात. शिवाय पुन्हा गाडीचा नंबर यावा म्हणून वेगाशी स्पर्धा करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जातो.
--------------------------------
पोलिस बघ्याच्या भूमिकेत
- वाडा परिसरातील बहुतांश महामार्गावर खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. यातील अनेक वाहने कालबाह्य झालेली आहेत. काही मार्गावर जीपच्या टपावर बसून वाहतूक केली जाते.
- चालकांकडे परवाना नाही. तसेच गाडीचा विमा संपलेला आहे, तर चालकांच्या शेजारी एकच जागा असताना काही चालक दोन, तर काही तीन प्रवासी बसवतात.
----------------------
अपघाताच्या घटना
वाडा-सोनाळे मार्गावर सोनशिव गावाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाले, तर १४ जण गंभीर जखमी होते. त्या वेळी बंद केलेली बेकायदा प्रवासी वाहतूक काही दिवसांतच पुन्हा सुरू करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com