अंधारातून उजेडाकडे २४० कुटुंबांची झेप

अंधारातून उजेडाकडे २४० कुटुंबांची झेप
Published on

२४० कुटुंबांची उजेडाकडे झेप
डहाणू परिसरात सोलर किटचे वाटप
कासा, ता. २० (बातमीदार)ः डहाणू परिसरात सामाजिक बांधिलकीतून तब्बल २४० गरजू कुटुंबांना सोलर किटचे वितरण करण्यात आले. इनर व्हील क्लब सी कोस्ट बॉम्बे, सोलोरॉन होम्स प्रा. ली., अरोरा मॅथीयू कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम करण्यात आला.
धानिवरी, महालक्ष्मी परिसरात सोलर किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये सोलर लाईटसह लॅपटॉप, दैनंदिन वापराच्या वस्तू, रुमाल, साबण, बिस्कीट, व्हॅसलिनचा समावेश होता. सामाजिक संस्था (पालघर), धानिवरी ग्रामपंचायत, कनसरी ग्रुप यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाला सोलोरॉन कंपनीचे मालक हरप्रीतसिंग तिब्ब, इनर व्हील क्लबच्या साधनाजी, डॉ. मिसेस सब्रवाल, शिल्पाजी, दिपाजी, सिखाजी तसेच गुरुमीत कौचर, मायसा तिब्ब, हर्षद ओंदकर, किरण, नीरज, विशाल सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com