जिल्हा जंबो कार्यकारणी जाहीर

जिल्हा जंबो कार्यकारणी जाहीर
Published on

भाजपची नव्या चेहऱ्यांना संधी
कल्याण जिल्हा कार्यकारिणी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : भाजपने कल्याण जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करत संघटनात्मक ताकद वाढवण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात सोमवारी (ता. २०) झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. या वेळी उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक शशिकांत कांबळे, दीपेश म्हात्रे आणि नाना सूर्यवंशी उपस्थित होते.

घोषित कार्यकारिणीत अनुभवी पदाधिकाऱ्यांसोबतच इतर पक्षातून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटन विस्ताराला प्राधान्य दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे. जिल्हाध्यक्ष नंदू परब याबाबत म्हणाले की, संघटना बळकट करण्यावर आमचा भर आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असलेले सर्व संघटनात्मक काम आम्ही आक्रमकपणे करणार आहोत. कार्यकारिणीत काम करणारी आणि अनुभवी माणसे आहेत. पक्षात नव्याने आलेले सर्व कार्यकर्ते आता भाजपचेच असून, तेही तितक्याच ताकदीने काम करतील.
--------------
महिला मोर्चा अध्यक्षपदी अर्चना सूर्यवंशी
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी अभिमन्यु गायकवाड, सुभाष म्हस्के, मनोज राय, संजय मोरे, प्रदीप चौधरी, जितेंद्र भोईर, प्रेमनाथ म्हात्रे, महेश पाटील, लक्ष्मण पाटील आणि संजय अदक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी रवी ठाकूर, निखील चव्हाण, अभिजित करंजुले आणि संदीप माळी यांची निवड झाली आहे. सचिवपदी प्रकाश भोईर, विजय जोशी, ओमनाथ नाटेकर, मनोज घरत, अमित कासार, परेश गुजरे आणि प्रकाश तेलगोटे यांचा समावेश आहे. याशिवाय महिला मोर्चा अध्यक्षपदी अर्चना सूर्यवंशी, युवा मोर्चा अध्यक्षपदी विक्रम तरे आणि किसान मोर्चा अध्यक्षपदी शाम पाटील यांची नियुक्ती करत भाजपने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com