आजपासून रंगणार कामगार कबड्डी स्पर्धेचा थरार

आजपासून रंगणार कामगार कबड्डी स्पर्धेचा थरार
Published on

आजपासून रंगणार कामगार कबड्डी स्पर्धेचा थरार
११० संघाचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० ः औद्योगिक व व्यावसायिक कामगारांच्या २९ व्या आणि महिलांच्या २४ व्या खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार मुंबईत मंगळवारपासून (ता. २१) बघायला मिळणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ११० हून अधिक संघ सहभागी झाले आहेत. २१ ते २५ एप्रिल या कालावधीत दररोज कबड्डीचे सामने रंगणार आहेत.
प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन येथे या स्पर्धेचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या वेळी कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल, आमदार मनीषा कायंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार सुनील शिंदे, कालिदास कोळंबकर, महेश सावंत तसेच स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार या लोकप्रतिनिधींसह कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे.

तीन गटांत स्पर्धा
पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला (खुला) अशा तीन गटांत स्पर्धेचे सामने होतील. तिन्ही गटांतील अंतिम विजेत्या संघांना प्रत्येकी ५० हजार रुपये, अंतिम उपविजेत्या संघांना प्रत्येकी ३५ हजार रुपये, तर अंतिम उपांत्य उपविजेता संघांना प्रत्येकी २० हजारांचे बक्षीस दिले जाईल. विजेत्या संघांना सांघिक चषक, खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल.या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या mhlabourwelfare या यूट्युब चॅनेल व फेसबुक पेजवरदेखील केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com