

रस्त्यावर रेचग्याच्या ढिगामुळे अपघाताचा धोका
बांधकामानंतर साहित्य न हटवल्याने नागरिक त्रस्त
श्रीवर्धन, ता. २० (वार्ताहर) : श्रीवर्धन शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून, पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालकांकडून बांधकामासाठी वापरण्यात आलेला रेचगा रस्त्याच्या कडेला तसाच टाकून दिला जात आहे. यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात वाढते पर्यटन आणि निवासी संकुलांमुळे पाखाडी व आळ्यांमध्ये होमस्टे, रिसॉर्ट्स उभारली जात आहेत. मात्र, बांधकामादरम्यान लोखंडी सळ्या, रेती, खडी, क्रश सॅन्ड आदी साहित्य रस्त्यालगत व गटारांमध्ये टाकले जाते.
बांधकाम पूर्ण झाल्यावरही हे साहित्य न उचलल्याने ते रस्त्यावर विखुरलेले राहते. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत नगर परिषदेने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
कोट
बांधकाम करत असताना मालकांकडून विटा, रेती, माती व इतर बांधकाम साहित्य हे नगर परिषदेच्या गटारात ठेवण्यात येते. बांधकाम पूर्ण झाल्यावर शिल्लक साहित्य रस्त्यावर विखुरले जाते. यामुळे अपघाताचा संभव असतो. नगर परिषदेकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल व दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- नगराध्यक्ष अतुल चौगुले, श्रीवर्धन नगर परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.