ठाण्यात ‘झाडांचा सापळा’

ठाण्यात ‘झाडांचा सापळा’
Published on

ठाण्यात ‘झाडांचा सापळा’!
१०० दिवसांत ७१ घटना; १५ वाहनांचे नुकसान, दशकात ५,५४८ वृक्ष कोसळले

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २० : शहरात झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटनांनी धोक्याची घंटा वाजवली असून, गेल्या १० वर्षांत तब्बल पाच हजार ५४८ वृक्ष पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, तर २०२६ या वर्षातील अवघ्या पहिल्या १०० दिवसांतच ७१ घटना नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये ४६ ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर २५ ठिकाणी फांद्या तुटून कोसळल्या आहेत. या घटनांमुळे १५ वाहनांचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

महिनानिहाय आकडेवारीतही वाढती तीव्रता दिसून येते. जानेवारी महिन्यात आठ झाडे कोसळून चार वाहनांचे नुकसान झाले. मार्चमध्ये १५ झाडे पडल्याने पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत १४ झाडे कोसळली असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, १ ते १७ एप्रिलदरम्यानच नऊ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

------------
नागरिकांनी सतर्क रहावे
या घटनांमध्ये सर्वाधिक फटका चारचाकी वाहनांना बसला असून, आठ कारचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल पाच तीनचाकी आणि दोन दुचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, शहरातील जुनाट व धोकादायक झाडे, नियमित छाटणीचा अभाव आणि बदलते हवामान ही प्रमुख कारणे पुढे येत आहेत. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, धोकादायक झाडांची वेळेत छाटणी व पाहणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे. प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा झाडांची माहिती तातडीने महापालिकेला कळवण्यात यावे, असे आवाहन केले आहे.
-----------------

* १० वर्षात पडलेल्या झाडांचा तक्ता
वर्ष झाडे
२०१६ ३७५
२०१७ ६१५
२०१८ ४८०
२०१९ ७७१
२०२० ५१२
२०२१ ६१८
२०२२ ५३७
२०२३ ४६९
२०२४ ६७०
२०२५ ५०१
एकूण ५५४८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com