मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा
Published on

प्रलंबित कामांना गती देण्यासाठी आयुक्तांचा दौरा
मॉन्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करा, अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाला ‘ऑन-ग्राउंड’ गती देण्यासाठी प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले असून, आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी स्वतः विविध प्रकल्पस्थळांवर जाऊन कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत, स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या विकासकामांना आता नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

उल्हासनगर महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. आयुक्त मनीषा आव्हाळे व अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांनी प्रत्यक्ष स्थळांवर भेट देत कामांचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी शहर अभियंता नीलेश शिरसाठे, उपअभियंता संदीप जाधव तसेच कनिष्ठ अभियंते आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या पाहणीत उल्हासनगर-१ येथील रिजेन्सी अंटेलिया कॉम्प्लेक्समधील आयुक्त निवासस्थान, तसेच पीएमई बस योजनेअंतर्गत शहाड येथील बस डेपोच्या जागेची पाहणी करण्यात आली. याशिवाय उल्हासनगर-३ येथील चोपडा कोर्ट परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, स्थानकसमोरील स्कायवॉक जवळील बस डेपो, चांदीबाई कॉलेज समोरील पुलाचे काम, तसेच कॅम्प ५ मधील टाऊन हॉल आणि गाऊन बाजार परिसरातील भाजी मार्केट या प्रकल्पांचाही सखोल आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान आयुक्त आव्हाळे यांनी सर्व प्रकल्प मॉन्सूनपूर्व पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले. कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे वेगात पूर्ण करावीत, तसेच कनिष्ठ अभियंत्यांनी नियमित स्थळपाहणी करून अडचणी तत्काळ वरिष्ठांकडे मांडाव्यात, असे निर्देश देण्यात आले. या निर्णायक भूमिकेमुळे शहरातील प्रलंबित कामांना गती मिळून नागरिकांना लवकरच सुविधांचा लाभ मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com