

महामार्गावरील अतिवेगाला लगाम
इंटरसेप्टर वाहने तैनात, नियमभंग करणाऱ्यांवर नजर
कासा, ता. २० (बातमीदार)ःमहामार्गांवरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पालघर वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने महामार्गावर आधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहने तैनात करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणे चालकांना भोवणार आहे.
वाहतूक पोलिसांनी कार्यान्वित केलेल्या इंटरसेप्टर वाहनांमध्ये अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे. लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीड गनद्वारे ३०० ते ५०० मीटर अंतरावरून वाहनांचा अचूक वेग मोजता येतो. तसेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन प्रणालीमुळे वाहनांचे क्रमांक नोंदवले जाऊन तत्काळ ई-चलान जारी केले जाते. याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर नियंत्रणासाठी आधुनिक ब्रेथ अॅनालायझरची सुविधा देण्यात आली आहे. वाहनांच्या काचांवरील बेकायदेशीर काळ्या फिल्मची तपासणी करण्यासाठी टिन्ट मीटरचा वापर करण्यात येतो. विशेष म्हणजे, ही वाहने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असून, विना हेल्मेट, विना सीटबेल्ट, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे यांसारख्या विविध उल्लंघनांची एकाच वेळी नोंद घेण्यास सक्षम आहेत.
--------------------------------
दंडाची पावती मोबाईलवर
वाहनचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पालघर पोलिसांनी केले आहे. तसेच वेगमर्यादा पाळणे, मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच सीटबेल्टचा वापर करणे अनिवार्य असून, नियमभंग करणाऱ्यांच्या मोबाईलवर थेट दंड येणार असल्याने तत्काळ कारवाई होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.