विमानतळ परिसरात ‘प्रवासी भाडे’वरून वाद

विमानतळ परिसरात ‘प्रवासी भाडे’वरून वाद
Published on

विमानतळ परिसरात ‘प्रवासी भाडे’वरून वाद
ओला-उबर स्टाफकडून खासगी वाहनचालकाला बेदम मारहाण
उलवे, ता. २० (बातमीदार) ः नवी मुंबई परिसरात उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसतानाच परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. प्रवासी भाड्यावरून वाद निर्माण होऊन ओला-उबरच्या ग्राउंड स्टाफने एका खासगी कारचालकाला बेदम मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे.
विमानतळ परिसरात प्रवासी भाड्यावरून खासगी चालक आणि ओला-उबर स्टाफमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन काही ओला-उबर स्टाफने संबंधित खासगी चालकाला मारहाण केली. सुरुवातीला हे ओला-उबर चालक असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात मारहाण करणारे हे चालक नसून ओला-उबरचे ग्राउंड स्टाफ असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणताही अधिकृत चालक कंपनीचा युनिफॉर्म परिधान करत नाही, ही बाबही स्थानिकांनी निदर्शनास आणून दिली.
या घटनेमुळे विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळ अद्यापही पूर्णपणे कार्यान्वित झाले नसताना अशी घटना घडल्याने भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न नागरिक आणि प्रवासीवर्गातून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि विमानतळाची प्रतिमा जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com