

टोकावडे, ता. २० (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये देवराळवाडी येथील गणपत जैनू मधे (वय ३२) यांचाही समावेश होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंब आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रहितम् क्लब’च्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे.
तालुक्यातील सुमारे ४० हून अधिक नागरिकांनी एकत्र येत एकूण २७,३०० रुपयांचा सहाय्य निधी उभारला. संघटनेच्या सदस्यांनी संबंधित कुटुंबाला भेट देऊन पाच हजार रोख रक्कम हाती सुपूर्द केली, तर उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. गणपत मधे हे १३ एप्रिलला पत्नीकरिता औषध आणण्यासाठी कल्याण येथे गेले असता, या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व तीन वर्षांचे लहान मूल आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या आरोग्यविषयक अडचणींची माहिती घेण्यात आली असून, पुढील आवश्यक मदतीबाबत क्लबमधील डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.