राशीचक्र उद्यान समस्यांच्या विळख्यात

राशीचक्र उद्यान समस्यांच्या विळख्यात
Published on

राशीचक्र उद्यान समस्यांच्या विळख्यात
खारघर, ता. २० (बातमीदार) : खारघर सेक्टर १९ मधील रहिवाशांसाठी विरंगुळ्याचे एकमेव साधन असलेले राशीचक्र उद्यान सध्या विविध समस्यांनी वेढले गेले आहे. अपुरी विद्युत व्यवस्था, उखडलेल्या फरशा आणि अ‍ॅम्पीथिएटरची झालेली दुरवस्था यामुळे नागरिक संताप व्यक्त करत असून, पालिकेच्या उद्यान विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
खारघर सेक्टर १९ मधील प्लॉट क्रमांक ४३ येथे पालिकेने राशीचक्र उद्यान उभारले आहे. वसाहतीच्या मध्यभागी आणि परिसरात एकमेव उद्यान असल्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उद्यानात सकाळ-सायंकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. उद्यानाच्या मध्यभागी हायमास्ट दिवा असला, तरी चोहोबाजूला असलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे खेळण्यांच्या परिसरात अंधार पसरलेला असतो. नागरिकांना उद्यानात छोटेखानी कार्यक्रमासाठी उभारलेल्या व्यासपीठाची दुरवस्था झाली आहे. जमिनीवरील फरशा निखळल्याने ज्येष्ठ आणि लहान मुलांना दुखापत होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, उद्यानातील समस्या पालिकेने दूर कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

उद्यानाच्या चोहोबाजूने लोकवस्ती आहे. उद्यानात केलेल्या पाहणीत खेळणी असलेल्या परिसरात अपुरी विद्युत व्यवस्था, निखळलेल्या फरशा आढळून आल्या आहेत. प्रभागातील उद्यानाच्या समस्या यासंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन समस्या दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील.
- परेशा ब्रिजेश पटेल, नगरसेविका

सेक्टर १९ मध्ये मुर्बी गाव आणि सिडको वसाहतीत एकमेव उद्यान आहे. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ असते. पालिकेने उद्यानातील समस्या दूर करावी.
- मेघनाथ ठाकूर, रहिवासी

उद्यानात निखळलेल्या फरशा आणि व्यासपीठ दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर झाले असून, लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. काही बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावे, अशा सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या आहेत.
- नानासाहेब कामठे, उपायुक्त, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com