

सदृढ आरोग्याचा मोखाड्यात जागर
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला सुरुवात
मोखाडा, ता. २० (बातमीदार)ः नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी शासनाने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाची मोखाड्यात सुरूवात करण्यात आली आहे.
गावातील प्रत्येक नागरिकाला घराजवळच आरोग्यसेवा देणे, प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवा देणे, नागरिकांच्या जीवनशैलीत बदल घडवणे, आरोग्यसेवा केंद्रस्थानी ठेवून, लोकसहभागातून आरोग्यसेवा बळकट करणे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझं गाव, आरोग्य संपन्न गाव हे अभियान शासनाने सुरू केले आहे. या अभियानात ग्रामपंचायत केंद्रबिंदू आहे. या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका समिती स्थापन करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी या समितीचे अध्यक्ष असून ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक, बालविकास प्रकल्प अधिकारी, पाणीपुरवठा, तालुका विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत पातळीवरदेखील कृती समितीची स्थापना करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.